Manasvi Choudhary
रोज घालण्यासाठी नाजूक वाटी मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. हे मंगळसूत्र अत्यंत हलके आणि दिसायला स्टायलिश असते.
नाजूक वाटी मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स कोणत्या आहेत जे तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
लहान वाटी पेडंट असलेले मंगळसूत्र सध्या महिला रोज घालण्यासाठी निवडतात काळे मणी आणि वाटी पेडंट यामध्ये असते.
काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्ये सिंगल मिनी वाटी पेडंट असलेले मंगळसूत्र डेली वेअर किंवा ऑफिसवेअरसाठी सुंदर दिसते.
सोन्याच्या वाटीमध्ये कडेला डायमंड वर्क केलेल्या डिझाईन्सचे पेडंट तुम्ही निवडू शकता खास डिझायनर साडी तसेच वेस्टर्न लूकवर हे मंगळसूत्र सुंदर दिसते.
मंगळसूत्रात मॅट फिनीश वाटी पेडंट डिझाईन्स असते हे मंगळसूत्र सध्या तरूणीमध्ये ट्रेंडमध्ये आहे.
मंगळसूत्रात वाटी डिझाईन्समध्ये फ्लोरल स्टाईल असते. ज्यामध्ये पानांची किंवा फुलांची नाजूक नक्षी कोरलेली असते. हे मंगळसूत्र नऊवारी साडी तसेच काठपदरी साडीवर उठून दिसते.