Manasvi Choudhary
उन्हाळ्यात त्वचेची योग्य काळजी घ्यावी लागते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर छिद्र तयार होतात या छिद्रांचे रूपांतर नंतर व्हाईट हेड्समध्ये होतात.
अनेकदा चेहरा सुंदर असला तरी चेहऱ्यावरचे व्हाईट हेड्स सौंदर्य खराब करतात. चेहऱ्यावरचे व्हाईट हेड्स सिंपल टिप्सने कसे काढायचे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
तेलकट त्वचा, धूळ यामुळे त्वचेवर व्हाईट हेड्स येतात व्हाईट हेड्स घालवण्यासाठी ५ सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घेऊया.
व्हाईट हेड्स काढण्यासाठी तुम्ही गरम पाण्याची वाफ घ्या यामुळे त्वचेची छिद्र उघडतात आणि त्यातील साचलेली घाण कमी होते.
मध आणि लिंबू याचे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि नंतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा यामुळे चेहरा स्वच्छ होतो
बेकिंग सोडा त्वचेला स्वच्छ करतो यामुळे छिद्रांमध्ये असलेली घाण बाहेर निघते यामुळे बेकिंग सोडा आणि पाणी याचे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
टी-ट्री ऑईल जंतूंना नष्ट करते, तर कोरफड त्वचेची जळजळ शांत करते यामुळे टी- ट्री ऑईलमध्ये कोरफड मिक्स करून रात्री चेहऱ्यावर लावा.