Manasvi Choudhary
हिवाळ्यात वटाणा खाल्ला जातो. वटाण्याची रस्सा भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते. घरोघरी वटाण्याची भाजी बनवली जाते.
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच वटाण्याची भाजी खायला आवडते. वटाण्याची भाजी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
तुम्ही घरीच अत्यंत सोप्या पद्धतीने वटाण्याची भाजी बनवू शकता. नेमकी प्रोसेस आणि साहित्य काय लागते हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
वटाण्याची भाजी बनवण्यासाठी वटाणा, मसाला, हळद, कांदा, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर, , ओले खोबरे, लसूण हे साहित्य घ्या.
सर्वात आधी कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग याची फोडणी द्या. नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या.
मिश्रणात लसूण पेस्ट, हळद, मसाला हे मसाले मिक्स करून यात वटाणे घाला. भाजीमध्ये थोडेसे पाणी घालून भाजी शिजण्यासाठी झाकण लावा.
चवीनुसार मिश्रणात मीठ घाला आणि त्यावर पाणी घालून रस्सा तयार करा आणि झाकण ठेवून वटाणा पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा.
अशाप्रकारे घरीच झणझणीत वटाण्याची रस्सा भाजी तयार होईल.