Vatana Batata Rassa Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी झणझणीत वटाणा-बटाटा रस्सा भाजी! पाहा ही सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

वटाणा बटाटा रस्सा भाजी

वटाणा बटाटा रस्सा भाजी ही प्रत्येक मराठी घरात बनणारी भाजी आहे. वटाणा बटाटा रस्सा भाजी खायला सर्वानाच आवडते.

Vatana Batata Rassa Bhaji

सोपी रेसिपी

वटाणा बटाटा रस्सा भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत ही भाजी सर्व्ह करू शकता.

Vatana Batata Rassa Bhaji

साहित्य एकत्र करा

वटाणा बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी बटाटे, ओला किंवा सुका वटाणा, कांदा, टोमॅटो, आलं - लसूण पेस्ट ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं , तेल, मसाला, हळद, गरम मसाला, जिरे, मोहरी, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.

Vatana Batata Rassa Bhaji

वाटण तयार करा

वटाणा रस्सा भाजी बनवण्यासाठी भाजलेले खोबरे, लसूण यांचे एकत्र वाटण तयार करा. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी द्या

Vatana Batata Rassa Bhaji

कांदा - टोमॅटो परतून घ्या

मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट टाका आणि कच्चा वास जाईपर्यंत परता. आता टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.

Fodni

बटाटा आणि वटाणा व्यवस्थित परतून घ्या

या मिश्रणात हळद, लाल तिखट, धणे पूड आणि गरम मसाला टाका. मसाला चांगला परतून घ्या नंतर यात बटाटे घालून वटाणा देखील व्यवस्थित परतून घ्या

Green peas | yandex

भाजी व्यवस्थित शिजवून घ्या

भाजी शिजण्यासाठी यात पाणी मिक्स करा आणि चवीनुसार मीठ टाका आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्या. भाजी शिजल्यावर कोथिंबीर घाला.

Vatana Batata Rassa Bhaji

next: Methi Moong Dal Bhaji Recipe: मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी कशी बनवायची?

methi bhaji
येथे क्लिक करा..