Manasvi Choudhary
मुगाची डाळ घालून केलेली मेथीची भाजी चवीला अतिशय चविष्ट लागते आणि मुगाच्या डाळीमुळे मेथीचा कडवटपणाही कमी होतो.
मुगाची डाळ घालून मेथीची भाजी घरी करण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही घरीच अगदी सहज पद्धतीने ही रेसिपी करू शकता.
मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथी, मुगाची डाळ, लसूण, हिरवी मिरची, तेल, मोहरी, जिरे, हळद, मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुवून १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. डाळ भिजल्यामुळे ती भाजीसोबत लवकर शिजते.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलात मोहरी आणि जिरे याची फोडणी घाला. जिरे तडतडले की त्यात ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घाला.
आता यात भिजवलेली मुगाची डाळ टाका. डाळ तेलात १-२ मिनिटे चांगली परतून घ्या. यामुळे डाळीला खमंग चव येते.
आता त्यात हळद आणि चिरलेली मेथीची भाजी टाका. मेथी आणि डाळ नीट एकत्र करून घ्या. भाजी वाफेवर शिजवून घ्या त्यात पाणी घालू नका.
भाजी शिजली की त्यात चवीनुसार थोडे मीठ मिक्स करा आणि संपूर्ण भाजी नीट मिक्स करा. अशाप्रकारे मुगाची डाळ घालून केलेली भाजी सर्व्हसाठी तयार होईल.