Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

Shreya Maskar

वटपौर्णिमा सण

यंदा वटपौर्णिमेचा सण २९ जूनला आला आहे. या दिवशी बायको नवऱ्यासाठी उपवास करते. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारते आणि सातजन्म हाच पती मिळावा यासाठी देवाकडे प्रार्थना करते.

Vat Purnima 2026 | pinterest

आंब्याचा पदार्थ

वटपौर्णिमेला आंबा, फणस हे पदार्थ बाजारात पुन्हा येतात. त्यामुळे वटपौर्णिमेला आवर्जून लाडक्या नवऱ्यासाठी रसाळ आंब्यांचा हलवा बनवा. झटपट होणारी रेसिपी आताच लिहून घ्या.

Mango | pinterest

आंब्याचा हलवा

आंब्याचा हलवा बनवण्यासाठी पिकलेले आंबे, साखर, तूप, रवा, सुकामेवा, वेलची, केशर आणि खवा इत्यादी साहित्य लागते.

Mango Halwa | pinterest

आंबा

आंब्याचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम आंब्याचा साल काढून त्याचा रस काढा. त्यानंतर सुकामेवा बारीक चिरून घ्या.semolina

Mango | yandex

रवा

आता एक पॅन गरम करून त्यात तूप टाकून रवा गोल्डन फ्राय करून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा. रव्याला सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.

semolina | pinterest

आंब्याची प्युरी

त्यानंतर भाजलेल्या रव्यात आंब्याची प्युरी मिक्स करा. सतत ढवळत रहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाही.

Mango puree | pinterest

साखर

मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात आवडीनुसार साखर मिक्स करा. पुढे वेलची पूड आणि केशर टाका. एक वाफ काढून घ्या.

sugar | pinterest

सुकामेवा

हलवा अधिक घट्ट होण्यासाठी खवा त्यात मिक्स करा. शेवटी आवडीनुसार सुकामेवा टाका आणि २-३ मिनिटे ठेवा. अशाप्रकारे मऊसूत आंब्याचा हलवा तयार झाला.

dried fruit | pinterest

NEXT : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Vat Purnima 2026 | saam tv
येथे क्लिक करा...