Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Shreya Maskar

वटपौर्णिमा

यंदा वटपौर्णिमेचा सण २९ जूनला आला आहे. या दिवशी घरात गोडाधोडाचे जेवण बनवले जाते. तुम्ही देखील लाडक्या नवऱ्यासाठी फणसाची पुरी बनवा. युनिक रेसिपी पाहा.

Vatpurnima | pinterest

फणसाची पुरी

फणसाची पुरी बनवण्यासाठी बरका फणस, गूळ, मैदा किंवा गहू, रवा, तूप, तेल इत्यादी साहित्य लागते.

phanaschi puri | pinterest

फणस

फणसाची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम फणस कापून त्यातील गरे आणि बिया वेगवेगळ्या काढून घ्या. फणसाचे गरे पातळ कापून ते मिक्सरला लावून त्याचा रस बनवा. यात पाणी अजिबात घ्यायचे नाही.

Fanas | pinterest

गूळ

एका पॅनमध्ये तूप टाकून फणसाची पेस्ट हलकी परतून घ्या. त्यात तुमच्या आवडीनुसार गूळ किसून टाका. त्यानंतर मिश्रण सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाही.

jaggery | pinterest

मैदा-गहू

५ मिनिटांनी गॅस बंद करून त्यात मैदा किंवा गहू थोड्या प्रमाणात टाका, जेणेकरून आपल्याला पीठ चांगले मिळता येईल.

flour-wheat | pinterest

पुरी लाटा

त्यानंतर पीठ चांगले मळून झाल्यावर १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून द्या. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून पुरी लाटून घ्या.

Puri | pinterest

पुरी तळा

दुसरीकडे तेल गरम करून त्यात फणसाची पुरी खरपूस गोल्डन फ्राय करून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा, जेणेकरून पुरी जळणार नाही.

puri | yandex

श्रीखंड - पुरी

अशाप्रकारे गोल, कुरकुरीत फणसाच्या पुऱ्या तयार झाल्या. तुम्ही श्रीखंडासोबत याचा आस्वाद घेऊ शकता.

Srikhand - Puri

NEXT : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

Diabetes Recipe | saam tv
येथे क्लिक करा...