Shreya Maskar
कारले मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात इन्सुलिनसारखे प्रथिने यांचे प्रमाण सर्वाधिक असते. हे घटक नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यास आणि शरीराची ग्लुकोज शोषण्याची क्षमता सुधारण्यास मदत करतात.
तुम्हाला चटपटीत पण हेल्दी खायचे असेल तर कारल्याच्या सालीची चटणी बनवा. अवघ्या १० मिनिटांत रेसिपी तयार होईल.
कारल्याची चटणी बनवण्यासाठी कारले, हिरव्या मिरच्या , लिंबू , काळे मीठ इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या. जेणेकरून चव चांगली लागले.
कारल्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून आणि सुती कापडाने पुसून घ्या. नंतर दोन्ही बाजूंचे देठ कापून टाका.
त्यानंतर कारल्याची सोल काढा आणि साली स्वच्छ पाण्यात एकदा धुवून एका भांड्यात ठेवा. तसेच कारल्यातील बिया देखील काढून टाका.
कारल्याच्या साली मिठाच्या पाण्यात सुमारे १५-२० मिनिटे भिजवून ठेवा. यानंतर पाण्यातून साली काढून मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या.
तयार मिश्रणात हिरव्या मिरच्या, काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला आणि चांगले मिक्स करा. अशाप्रकारे स्वादिष्ट कारल्याच्या सालीची चटणी तयार आहे.
तयार चटणी काचेच्या बरणीत भरून ८ ते १० दिवस फ्रीजमध्ये ठेवून द्या. जेवणासोबत याचा आस्वाद घ्या.