Jackfruit Laddu Recipe : बेसन, रव्याचे लाडू तर नेहमी खाता; एकदा ट्राय करा फणसाचे लाडू, वाचा युनिक रेसिपी

Shreya Maskar

फणसाचे लाडू

फणसाचे लाडू हे फणसातील बियांपासून बनवले जातात. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. फणसाच्या बियांच्या लाडूची कृती जाणून घेऊयात.

Jackfruit Seed Ladoo | pinterest

फणसाच्या बियांचे लाडू साहित्य

फणसाच्या बियांचे लाडू बनवण्यासाठी फणसाच्या बिया, सुखामेवा, ऑलिव्ह तेल, सुंठ पूड, काळी मिरी पूड, दूध, वेलची पूड, साखर किंवा गूळ,ओले खोबरे , डिंक आणि तूप इत्यादी साहित्य लागते.

Jackfruit Seed Ladoo | pinterest

फणसाच्या बिया

फणसाच्या बियांचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम फणस नीट फोडून त्यातील गरे आणि बिया वेगळ्या काढा. बिया पाण्यात चांगल्या स्वच्छ करून घ्या.

Jackfruit Seeds | pinterest

फणसाच्या बिया शिजवा

फणसाच्या बिया स्वच्छ झाल्यावर त्यात कुकरला लावून ३-४ शिट्ट्या करून उकडून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा.

Cook the Jackfruit Seeds | pinterest

बियांची पेस्ट बनवा

बिया थंड झाल्यावर त्यांची साले काढा आणि मिक्सरला वाटून घ्या. यात पाणी टाकू नका. तयार बियांची पेस्ट एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या.

Make a Paste of the Seeds | pinterest

वेलची पूड

बाऊलमध्ये ऑलिव्ह तेल, सुंठ पूड, काळी मिरी पूड, वेलची पूड टाकून सर्व मिक्स करा. त्यानंतर तुम्ही यात गोडासाठी साखर किंवा गूळ यांचा वापर करू शकता.

Cardamom Powder | pinterest

ओले खोबरे

मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात ओले खोबरे, डिंक आणि तूप मिक्स करा. शेवटी ड्रायफ्रूट्सचे छोटे काप करून मिक्स करा.

Fresh Coconut | pinterest

लाडू वळा

आता हाताला तूप लावून छान मध्यम आकाराचे गोल फणसाच्या बियांचे लाडू बनवा. रोज एक लाडू खा, यामुळे शरीराला देखील चांगले पोषण मिळेल.

Shape the Ladoos | pinterest

NEXT : वटपौर्णिमेला खास बनवा खमंग-कुरकुरीत फणसाच्या बियांचे वडे, एकदा ट्राय करा ही कोकणी रेसिपी

Jackfruit Seeds Vada Recipe | saam tv
येथे क्लिक करा...