Priya More
१० जूनला म्हणजे मंगळवारी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे.
विवाहित महिला वटपौर्णिमा या सणाची आतुरतेने वाट पाहतात.
सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात.
लाल, हिरवा, पिवळा, केशरी आणि गुलाबी हे रंग विवाहित महिलांसाठी शुभ असतात.
विवाहितेने लाल, हिरवा, पिवळा, केशरी आणि गुलाबी या रंगाच्या साड्यांचा वापर करावा.
हे सर्व रंग सौभाग्याचे रंग मानले जातात. त्यामुळे या रंगाच्या साड्याच नेसाव्यात.
वटपौर्णिमेला काठपदराच्या साड्या तुम्ही नेसण्याचा प्रयत्न करा.
वटपौर्णिमेला नवीनच साडी नेसावी असं काही नाही. तुम्ही कोणतिही साडी नेसू शकता.
वटपौर्णिमेला तुम्ही मासिक पाळीत किंवा कोणतेही अशुभ कार्यादरम्यान नेसलेली साडी नेसू नये.