Priya More
वटपौर्णिमा हा सण येत्या १० जूनला म्हणजे मंगळवारी साजरा केला जाणार आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
काळ्या रंगाची किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू नका.
काळा आणि पांढरा रंग हा अशुभ मानला जातो. त्यामुळे या रंगाच्या साड्या अजिबात नेसू नका.
वटपौर्णिमेला लाल, हिरवा, पिवळा, केशरी आणि गुलाबी या रंगाच्या साड्या नेसाव्यात.
लाल, हिरवा, पिवळा, केशरी आणि गुलाबी हे रंग सौभाग्याचे रंग मानले जातात.
वटपौर्णिमेला महिलांनी काठपदराच्या साड्या नेसण्याचा प्रयत्न करावा.