Priya More
कोरोनाने पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
भारतात कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली असून रुग्णांची संख्या वाढत आहे.
कोरोना रुग्णांमध्ये अनेक लक्षणं दिसून येत आहेत. वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचे आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वास आणि चव कमी होणे हे प्रमुख लक्षण मानले जात होते.
कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल झाला आहे. आता कोरोनाची आणखी काही लक्षणे दिसत आहेत.
सतत घसा खवखवत असेल आणि घसा दुखत असेल तर कोरोना टेस्ट करा.
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर हे देखील कोरोनाचे लक्षण आहे.
सतत सौम्य ताप येत असेल आणि स्नायू दुखत असतील तरी कोरोनाची टेस्ट करा.
नाक बंद होणे, सतत डोकेदुखी होणे हे देखील कोरोनाचे लक्षण आहे.
गॅसशी संबंधित सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.