Shreya Maskar
उपवासाला झटपट साबुदाणा खीर बनवा.
साबुदाणा खीर बनवण्यासाठी साबुदाणा, दूध, साखर, वेलची पावडर, तूप, काजू आणि बदाम इत्यादी साहित्य लागते.
साबुदाणा खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा 2-3 तास पाण्यात भिजवून ठेवा.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू-बदाम भाजून घ्या.
आता पॅनमध्ये दूध टाकून त्यात साखर विरघळून घ्या.
त्यानंतर यात साबुदाणा मिक्स करून ढवळत रहा.
गॅस बंद करून यात वेलची पावडर टाका.
एक वाटी साबुदाणा खीर खाल्ल्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील.