Shreya Maskar
भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी शिमला मिरची, उकडलेले बटाटे, पनीर, कांदा, गाजर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी आले, हिरवी मिरची , जिरे, हळद, धणे पूड, लाल तिखट, जिरे पूड, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ इत्यादी मसाले लागतात.
भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम लहान आकाराच्या शिमला मिरच्या धुवून देठ कापून त्यातील बिया काढून टाका.
सारण तयार करण्यासाठी एका भांड्यात उकडलेले बटाटे, पनीर मॅश करा.
पॅनमध्ये तेल गरम करून शिमला मिरची फ्राय करा.
आता पॅनमध्ये तेल टाकून जिरे, हिरवी मिरची, आलं, कांदा, हळद, जिरे पूड, लाल तिखट, गरम मसाला, धणे पूड, गाजर, चवीनुसार मीठ, मॅश केलेले बटाटे आणि पनीर घालून नीट परतून घ्या.
तयार मिश्रण शिमला मिरचीमध्ये भरून शिमला मिरची तेलात खरपूस तळा.
तुम्ही यात तळलेले काजू देखील टाकू शकता.