Bharat Jadhav
घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावणे ही एक लोकप्रिय प्रथा आहे. वास्तुशास्त्रात त्याचा अनेक शुभ परिणामांचा उल्लेख करण्यात आलाय.
वास्तुनुसार, घोड्याची नाल नकारात्मक उर्जेपासून रक्षण करते. नाल एका संरक्षक कवचासारखे काम करते.
घोड्याच्या नालाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मुख्य दरवाजावर नाल लावल्याने घरात सुख, समृद्धी येत असते.
काळ्या घोड्याची नाल शनीच्या दुष्परिणामांना रोखत असते. घोड्याची नाल घरात संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते.
मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावल्याने घरात सकारात्मकता उर्जा असते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सुसंवाद टिकून राहतो.
वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस वरच्या दिशेने "U" आकाराचा घोड्याचा नाल ठेवणे शुभ मानले जाते. तर तो खालच्या दिशेने ठेवल्याने घरात समृद्धी येते.
जुने आणि वापरलेले घोड्याचे नाल अधिक शुभ असते. त्यात नाल काळ्या घोड्याची असली पाहिजे. शनिवारी घोड्याची नाल दरवाजाला लावणं शूभ असते.