Rashmika Mandana: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचं शिक्षण किती माहितेय का?

Bharat Jadhav

लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाहीये.

‘नॅशनल क्रश’

निरागस हास्याने, उत्कृष्ट अभिनयाने आणि हृदयस्पर्शी शैलीने तिने लाखो लोकांच्या हृदयात घर निर्माण केलंय. तिला ‘नॅशनल क्रश’ म्हटलं जातं.

जन्म कुठे झाला

रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यातील विराजपेट गावात झाला.

आई-वडील काय करतात

रश्मिकाचे वडील मदन मंदान्ना यांच्याकडे कॉफी इस्टेट आणि एक फंक्शन हॉल आहे, तर आई सुमन मंदान्ना गृहिणी आहे.

शालेय शिक्षण

रश्मिकाचे शालेय शिक्षण गोनीकोप्पल येथील कूर्ग पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे.

पुढील शिक्षण

रश्मिकाने म्हैसूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स येथे प्री-युनिव्हर्सिटी कोर्स केला. त्यानंतर एम.एस. मध्ये प्रवेश घेतला.

पत्रकारितेची पदवी

रामैया कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून रश्मिकाने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे

मॉडेलिंगमधून मिळाली पहिली ओळख

रश्मिकाने ‘क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस ऑफ इंडिया’ हा किताब जिंकला. यानंतर तिला ‘क्लीन अँड क्लियर’ ची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले. येथूनच मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला.