Manasvi Choudhary
वास्तूशास्त्रात, व्यक्तीच्या जीवनाविषयीचे अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन केल्यास जीवनात सुख- समृद्धी येते.
वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये तुम्ही योग्य ठिकाणी बसून जेवण करणे महत्वाचे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जेवायला बसता ती जागा शुभ असणे महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या योग्य ठिकाणी जेवण न केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते आणि पैशांची तंगी भासते.
वास्तुशास्त्रानुसार, दाराच्या मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच उंबरठ्यावर बसून कधीही जेवू नये.
अनेकांना बेडवर म्हणजेच पलंगावर बसून जेवणाची सवय असते मात्र असे करू नये. पलंगावर बसून जेवल्याने आर्थिक नुकसान होते.
देव- देवतांची जागा म्हणजेच पूजा स्थळी जेवण करणे अशुभ मानले जाते. घरात सुख- समृद्धीस अडथळा निर्माण होतो.
अनेकजण खराब ठिकाणी, घाण असलेल्या ठिकाणी जेवायला बसता मात्र असे देखील करू नका अन्नाची देवी अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो.
स्वयंपाकघरात म्हणजेच गॅसच्या शेगडीजवळ कधीही जेवायला बसू नये यामुळे घरात वाद होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.