Matka Buying Tips: उन्हाळ्यात मातीचा मटका खरेदी करताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पाणी थंड होणारच नाही

Manasvi Choudhary

मटका

सध्या बाजारात मटका खरेदीला ग्राहकांची गर्दी दिसत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी साठवूण ठेवण्यासाठी मटका वापरतात.

Matka Buying Tips | Pintrest

मातीचा मटका डिझाईन्स

मातीच्या मटकापासून ते विविध डिझाईनचे मटका बाजारात उपलब्ध आहेत. अनेक रंगामध्ये देखील मटका डिझाईन केलेले आहेत.

Matka Designs | Pintrest

खरेदी करताना काय काळजी घ्याल

मटका दिसायला आकर्षक असला तरी त्यात पाणी गार होणं महत्वाचं आहे यासाठी बाजारातून मटका खरेदी करताना काळजी घ्या.

Matka Buying Tips | Pintrest

आरोग्यासाठी गुणकारी

फ्रिजपेक्षा नैसर्गिकरित्या मातीच्या मटक्यात पाणी गार होते हे पाणी आरोग्यासाठी देखील गुणकारी मानले जाते.

Matka Buying Tips | Pintrest

गुणवत्ता तपासून घ्या

मातीचा माठ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता तपासून घ्या. अनेकदा मातीचा मटका तयार करताना सिमेंटचा वापर केला जातो आणि त्यावर रंगीबेरंगी डिझाईन केलेली असते. लाल किंवा काळा रंगाचा मटका पाणी ठेवण्यासाठी खरेदी करणे महत्वाचे आहे.

Matka Buying Tips | Pintrest

मजबूत मटका खरेदी करा

मटका खरेदी करताना तो जड आणि मजबूत असा घ्या. त्यात पाणी बराच वेळ थंड राहते आणि मटका लवकर फुटतही नाही.

Matka Buying Tips | Pintrest

पाणी टाकून तपासा

मटका हातात घेऊन नीट तपासा यामुळे मटका कुठे फुटला आहे की नाही किंवा चिर पडली आहे की नाही त्यात पाणी टाकून गळतोय की नाही हे तपासून घ्या.

Matka Buying Tips | Pintrest

रंगीबेरंगी मटका खरेदी करू नका

मटका हा रंगीबेरंगी चमकदार दिसणारा खरेदी करू नका. या मटक्यात पाणी थंड होत नाही.

Matka Buying Tips

next: Multani Mitti Hair Mask: लांब आणि दाट केसांसाठी लावा मुलतानी माती हेअर मास्क

येथे क्लिक करा...