Sakshi Sunil Jadhav
सध्या महागाई वाढत चालली आहे म्हणून पैसाही पाण्यासारखा खर्च होतोय. बचत करणं हा सगळ्यात मोठा टास्क वाटायला लागलाय.
गरजेच्या वस्तू विकत घेतल्यानंतर घरात पैसा टिकवणं खूप कठीण झालाय. त्यामुळे अनेकांचं आर्थिक गणितच हललं आहे.
तुम्ही अशावेळेस लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता. त्याने तुमच्या आयुष्यात भरभराट होऊ शकते.
घरात पैशासोबत सुख-सुविधा, समृद्धी आणि आनंदाचं वातावरण हवं असेल तरही तुम्ही पुढील उपाय करू शकता.
जर तुमचा खर्च जास्त वाढत चालला असेल तर महिन्याच्या पहिल्याच दिवशी देवीच्या फोटोजवळ कितीही रुपयांचं नाणं ठेवत जा.
नाण्याची तिथे पूजा करा आणि नाणं पिठाच्या पाण्यात ठेवा. त्याने तुमचा अनावश्यक खर्च कमी होतो.
तुमचे साठवलेले पैसे सतत खर्च होत असतील तर तुमच्या पाकिटात सात लवंग ठेवा. दर महिन्याला या लवंगा बदलत राहा.
तुम्हाला अचानक धनलाभ हवा असेल तर, शुक्रवारी देवीच्या प्रतीमेजवळ जास्वंदाची फुलं वाहा. हार सुद्धा चालेल. त्याने तुम्हाला रातोरात फायदा होण्याची शक्यता आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. याचं कुठलंही समर्थन अथवा दावा साम टिव्ही करत नाही.