ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
यावर्षी श्री कुष्ण जयंती १६ ऑगस्ट रोजी साजरा केली जाणार आहे.
या दिवशी घरात सकारात्मक आणि आनंदी वातावरण ठेवल्यास भगवान विष्णुची कृपा लाभते.
पण वास्तु शास्त्रानुसार घरातील काही वस्तू नकारात्मकता पसरवतात.
त्यामुळे तुमच्या घरात या वस्तु असल्यास आजच त्या काढून टाका. जेणेकरून तुमच्या घरातील सुख समृद्धी टिकून राहील.
श्री कृष्णाच्या किंवा इतर देवी-देवतांच्या तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या मुर्ती घरात ठेवल्याने नकारात्मकता येते.
या दिवशी घरात धूळ किंवा अस्वच्छता असू नये. विशेषत: देवघर स्वच्छ व नीटनेटके ठेवावे.
घरात नकारात्मक ऊर्जा देणारे पेंटींग्स ठेवणे टाळले पाहीजे. जसे की, लढाई किंवा उदास चित्रे.
देवघरात किंवा पुजेच्या ठिकाणी खोटे किंवा दिखाऊ दागिने ठेवणे टाळा.
जन्माष्टमीच्या दिवशी घरात शिळे अन्न, नैवेद्य किंवा प्रसाद ठेवणे टाळा.