Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घरातील वस्तूंची दिशा आणि मांडणीला विशेष महत्त्व दिले जाते. घरामध्ये फॅमिली फोटो लावताना काही दिशांचा आणि भिंतींचा विचार करणे महत्वाचे आहे.
घरामध्ये योग्य जागी फोटो लावल्याने सकारात्मक वातावरण राहते अशी मान्यता आहे यामुळे घरात कोणत्या भितींवर फॅमिली फोटो लावावा आणि कोणत्या भिंतीवर फॅमिली फोटो लावू नये हे जाणून घ्या.
पती-पत्नीचा रोमँटिक फोटो बेडरूममध्ये लावणे योग्य मानले जाते यामुळे नात्यात गोडवा राहतो. प्रेम वाढते.
दक्षिण आणि पश्चिम भिंतींना वास्तुशास्त्रामध्ये पितरांची दिशा मानले जाते. या भिंतींवर आनंदी कौटुंबिक फोटो लावणे टाळावे.
तुमचे घर जर एकमजली, दुमजली असेल तर घराच्या जिन्या खाली किंवा कोपऱ्यात, आंधारात कुटुंबाचा फोटो लावणे अत्यंत अशुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रेम आणि एकता टिकून राहण्यासाठी फॅमिली फोटो नेहमी घराच्या हॉलमध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावा.
संपूर्ण कुटुंबाचा फॅमिली फोटो बेडरूममध्ये लावणे वास्तूशास्त्रानुसार टाळावे. यामुळे वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.