ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरातील देवघर हे सर्वात पवित्र स्थान असते. घरात देवघरामुळे नेहमी प्रसन्न वाटते.
रोज देवघरातील देवांची पूजा केला घरात सुख- समृद्धी येते.
वास्तुशास्त्रानुसार, या गोष्टी कधीच घरात ठेवू नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल.
अनेकदा आपण अगरबत्ती पेटवल्यानंतर माचिसच्या काड्या मंदिरातच ठेवतो. असे केल्याने अनेक समस्या निर्माण होतात.
देवघरात कधीच तुटलेली मूर्ती ठेवू नये. यामुळे तुमच्या घरात भांडणे होऊ शकतात.
मंदिरात नेहमी एकाच देवाची किंवा देवीची मूर्ती ठेवावी. असे न केल्यास तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही.
देवघरात कधीच कोमेजलेली फुले ठेवू नका. यामुळे तुमची प्रगती होत नाही.
वरील माहिती गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.