Siddhi Hande
नवीन घर घेण्याचा प्रवास सगळ्यांचा वेगळा असतो. त्यामुळे स्वतः चे घर प्रत्येकासाठी खास असते.
कठीण प्रयत्नानंतर नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होते.
घरामध्ये वास्तू फार महत्वाची असल्याने, घरामधील वातावरण आणि जीवनाची गुणवत्ता वाढवण्यास वास्तू सहकार्य करत असते.
नवीन घर घेताना घराची योग्य दिशा फार महत्वाची आहे. घराचे मुख्य तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला असावे.
घरामधील लिव्हिंग रूम वायव्य दिशेला असले पाहिजे, कारण हे संपत्ती आणि समृद्धीसाठी योग्य आहे.
नवीन घरामधील स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असल्याने ही दिशा अग्नी आणि उर्जेशी संबंधित आहे.
बेडरूम नैऋत्य दिशेला असावा, कारण उत्तरेकडे ठेवणे अशुभ मानले जाते.
स्नानगृह वायव्य दिशेला असायला हवे, कारण ही दिशा स्नानगृहासाठी शुभ असते.
नवीन घर घेताना नेहमी खिडक्या पूर्वेला आणि उत्तरेला असतील याची खात्री करा. घरामध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश फार आवश्यक आहे.