Vastu Shastra: बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; पैसे पण जातील आणि आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

Shruti Vilas Kadam

तुटलेला आरसा

बाथरूममध्ये तुटलेला आरसा ठेवणे टाळावे. असे मानले जाते की यामुळे नकारात्मकता वाढते आणि घरातील वातावरणावर चुकीचे परिणाम होतात.

Vastu Shastra

घाणेरडे आणि ओले कपडे

वास्तुशास्त्रानुसार, अंघोळीनंतर घाणेरडे आणि ओले कपडे बाथरूममध्ये तसेच पडून राहू देऊ नयेत. ते धुवून वाळवले पाहिजेत. जर तसे करणे शक्य नसेल, तर घाणेरडे कपडे 'लॉन्ड्री बॅग'मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Woolen Cloth | yandex

औषधे (Medicines)

बाथरूममधील उष्णता आणि आर्द्रतेमुळे औषधांची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे औषधे नेहमी थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.

Dangerous Medicines

टॉवेल

सततच्या ओलाव्यामुळे टॉवेलमध्ये जंतू आणि बुरशी वाढू शकते. वापरानंतर टॉवेल हवेशीर जागेत वाळत घाला.

Towels | saam tv

मेकअपचे साहित्य

फाउंडेशन, लिपस्टिक, मस्कारा आणि इतर मेकअपचं सामान ओलाव्यामुळे खराब होऊ शकतात आणि त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.

Makeup Products | pinterest

दागिने

बाथरूममधील ओल्यामुळे चांदी, कृत्रिम दागिने किंवा काही धातू काळे पडू शकतात किंवा त्यांची चमक कमी होऊ शकते.

jewellery Designs

इलेक्ट्रॉनिक उपकरणे

हेअर ड्रायर, ट्रिमर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सततच्या ओलाव्यामुळे खराब होऊ शकतात. त्यांना सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.

Phone

कागदपत्रे

ओल्यामुळे कागद खराब होतो, बुरशी येते आणि पानांचे नुकसान होते. त्यामुळे कागदपत्रे बाथरूममध्ये ठेवू नयेत.

Books

Shahi Tukda Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा

Shahi Tukda Recipe | AI
येथे क्लिक करा