Manasvi Choudhary
वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये कोणतीही गोष्ट करण्यामागे वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेणे महत्वाचे आहे.
घरात लादी पुसताना पाण्यात मिठाचे खडे मिक्स केल्याने नकारात्मक उर्जा दूर होते. यामुळे घरातील भांडण, तणाव किंवा सतत आजारपण येणे दूर होते.
मीठ हे जंतूनाशक आहे यामुळे लादी पुसताना पाण्यात मीठ टाकल्याने जमिनीवरील सूक्ष्म कण देखील मरतात व घर स्वच्छ राहते.
वास्तू शास्त्रानुसार, मिठाचा संबंध 'राहू' आणि 'शुक्र' ग्रहाशी जोडला जातो. मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्यास राहुचे दोष कमी होतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो, असे मानले जाते
वास्तुशास्त्रानुसार शक्यतो सकाळी घर पुसताना हा उपाय करावा. लादी पुसून झाल्यावर ते पाणी घरात न टाकता बाहेर ओतून द्यावे
वास्तू शास्त्रानुसार, गुरुवारी पाण्यात मीठ टाकून लादी पुसू नये यामुळे घरातील सुख- समृद्धीवर परिणाम होतो
जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या खोलीत खूप अस्वस्थ वाटते, तर एका काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ भरून ती वाटी खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवा