Manasvi Choudhary
गरमा गरम भाताबरोबर तुरीची डाळ खायला सर्वानाच आवडते. फोडणीची तुरीची डाळ चवीष्ट लागते.
हॉटेलसारखी चव आणि छान 'तडका' येण्यासाठी तुरडाळीची रेसिपी आज आपण पाहूया.
तुरीची डाळ बनवण्यासाठी तुरडाळ, हळद, हिंग, तेल, तूप, मोहरी, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची, लसूण, कांदा आणि टोमॅटो, मसाला, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
तुरीची डाळ बनवण्यासाठी सर्वातआधी तुरडाळ स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये डाळ, पाणी, हळद, हिंग आणि तेल मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये तेल किंवा तूपामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता याची फोडणी द्या नंतर यात ठेचलेला लसूण आणि लाल मिरची चांगली परतून घ्या.
संपूर्ण मिश्रण चांगले परतून झाल्यानंतर त्यात कांदा मिक्स करा नंतर यात टोमॅटो चांगला परतून घ्या.
तयार मिश्रणात डाळ मिक्स करा आणि डाळ चांगली व्यवस्थित परतून त्यात गरम पाणी मिक्स करा.
चवीनुसार मीठ आणि थोडे लाल तिखट मिक्स करा डाळीला मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्या. जेणेकरून फोडणीचा स्वाद डाळीत उतरेल.
गॅस बंद करा आणि वरून भरपूर कोथिंबीर टाका. तुमची गरमागरम तुरीची डाळ तयार आहे!