Bhayandar Tourism : हिरव्या डोंगररांगा अन् समुद्राची गार हवा, भाईंदरजवळील 'हा' बीच तुम्हाला नक्की आवडेल

Shreya Maskar

वसई-विरार

उत्तन बीच हे मुंबईजवळील एक शांत, स्वच्छ आणि कमी गर्दीचे समुद्रकिनाऱ्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वसई-विरारच्या लोकांसाठी वीकेंडला फिरायला हे बेस्ट लोकेशन आहे.

Vasai-Virar | google

उत्तन बीच

उत्तन बीच हा मीरा-भाईंदर भागात वसलेला आहे. संध्याकाळी निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे मनसोक्त वेळ घालवू शकता. तुम्ही येथे फोटोशूटचा भन्नाट आनंद घ्या.

Uttan Beach | google

समुद्रकिनाऱ्याची वैशिष्ट्ये

उत्तन बीचचा परिसर येथील स्थानिक कोळी संस्कृती, ताजे सी-फूड, टेकडीवरून दिसणारी सुंदर दृश्ये यांसाठी ओळखले जाते.

Characteristics of the beach | google

शांत वातावरण

मुंबईतील मुख्य शहरांमधील समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत येथे खूपच कमी गर्दी असते आणि परिसर अधिक स्वच्छ असतो.

Calm atmosphere | google

सी-फूड

उत्तन बीचला आल्यावर आवर्जून येथील सी-फूडचा आनंद घ्या. तसेच समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला खाण्यापिण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आहेत.

Sea-food | google

निसर्ग सौंदर्य

पावसाळ्यात येथे थंड वाऱ्याचा स्पर्श होते. थंड पाण्यातून चालताना संध्याकाळी खूपच भारी वाटते. लहान मुलांना हे ठिकाण खूपच आवडेल.

Beauty of nature | google

कसं जाल?

उत्तन बीचला जाण्यासाठी विरार ट्रेन पकडून भाईंदर स्टेशनला उतरा. पुढे स्टेशनपासून उत्तन बीचपर्यंत रिक्षाने प्रवास करा.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात वीकेंडला फिरायला जायचंय? सानपाड्याजवळची 'ही' ठिकाणं आहेत खास

Sanpada Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...