Shreya Maskar
नवी मुंबई येथे सानपाडा हे ठिकाण आहे. वीकेंडला पावसाळ्यात तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता. सानपाडाजवळील सुंदर ठिकाणांची यादी नोट करा.
खारघर येथे पांडवकडा धबधबा आहे. मुसळधार पावसात हे ठिकाण बहरून येते. हा धबधबा हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला आहे.
नेरुळ येथे शिरवणे धबधबा आहे. दगडखाणीच्या (quarry) परिसरात असलेला, अनेक टप्प्यांतून वाहणारा हा धबधबा पावसाळ्यात खुलतो. कुटुंबासोबत दुपारच्या पिकनिकसाठी बेस्ट ठिकाण आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्य हे मुंबई-गोवा महामार्गावर आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्यात कर्नाळा किल्ला देखील आहे. तुम्ही येथे मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
सानपाड्यापासून काही अंतरावर गाडेश्वर धरण वसलेले आहे. गाडेश्वर धरण हे पावसाळ्यात हिरव्यागार टेकड्यांनी नटलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
सानपाड्याजवळचे हिल स्टेशन शोधत असाल तर खंडाळा बेस्ट आहे. पावसाळ्यात हे ठिकाण धक्याने आणि धबधब्यांनी वेढलेले असते.
सानपाड्यापासून माथेरान या हिल स्टेशनला तुम्ही जाऊ शकता. हे पावसाळ्यात हे ठिकाण दाट ढग आणि धुक्याने पूर्णपणे आच्छादलेले असते. वीकेंडला तुम्ही येथे फॅमिली ट्रिप प्लान करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.