Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला वन डे ट्रिप प्लान करायची असेल तर बेना समुद्रकिनारा सुंदर लोकेशन आहे. येथे तुम्ही कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत ट्रिप प्लान करा.
बेना बीच हा सुंदर समुद्रकिनारा वसई पश्चिम येथे आहे. विरारजवळील हे भन्नाट पिकनिक स्पॉट आहे. बेना बीच पालघरमध्ये येते.
बेना बीच सोनेरी-काळ्या रंगाची वाळू, निसर्गरम्य दृश्ये यांसाठी प्रसिद्ध आहे. वसई रोड स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने तुम्ही बीचपर्यंत जाऊ शकता.
तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायचा असेल तर बेना बीचला नक्की भेट द्या. तसेच हे ठिकाण फोटोशूटसाठी देखील बेस्ट आहे.
बेना बीचच्या आजूबाजूला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. निसर्गाच्या सानिध्यात येथे तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.
पावसाळ्यात सुंदर मोकळे आकाश, लाटांचा शांत आवाज आणि पाण्याने भिजलेले हिरवेगार रस्ते पाहून मन मोहून जाते. सकाळ आणि संध्याकाळी शांत फेरफटका मारण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
वसई किल्ला, जीवदानी मंदिर, सुरुची बीच, भुईगाव बीच, तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान आणि पेल्हार धरण यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.