Palghar : भव्य तटबंदी, भक्कम बुरुज; मुंबईजवळ पालघरमध्ये लपलाय 'हा' किल्ला

Shreya Maskar

मुंबई

मुंबईच्या अगदी जवळ वसई किल्ला लपलेला आहे. वसई किल्ल्याला 'बसीन किल्ला' म्हणूनही ओळखले जाते.

Mumbai | google

पालघर

वसई किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई येथील 'पाचू बंदर' भागात, मुंबईपासून उत्तरेस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर वसलेला आहे.

Palghar | google

वसई किल्ला

वसई किल्ला समुद्रकिनाऱ्यावर वसलेला असून, येथून उल्हास नदी अरबी समुद्राला जिथे मिळते, तो संगम परिसर दिसतो. वसई किल्ला हा १६ व्या शतकातील पोर्तुगीजकालीन ऐतिहासिक किल्ला आहे.

Vasai Fort | google

किल्ला कोणी बांधला?

वसई किल्ल्याची उभारणी पोर्तुगीजांनी केली. त्यांनी १५३६ मध्ये हा किल्ला बांधला. गुजरातचा सुलतान बहादूर शाह याने १५३३ मध्ये बांधलेल्या एका लहान किल्ल्याच्या जागी त्यांनी हा नवीन आणि मोठा किल्ला उभारला.

Who built the fort? | google

किल्ल्याचा आकार

वसई किल्ल्याचा आकार साधारणपणे दशकोनी आहे. हा एक अनियमित बहुभुज आकाराचा किल्ला असून तो सुमारे ११० एकर परिसरात पसरलेला आहे.

The size of the fort | google

किल्ल्याची तटबंदी

जाड दगडी भिंती, १०-११ बुरुज आहेत. किल्ल्याला भेट दिल्यावर युरोपियन शैली पाहायला मिळते.हा किल्ला शक्तिशाली तोफांच्या माऱ्यापासून वस्तीचे संरक्षण करण्यास सक्षम होता.

The fortifications of the fort | google

इतिहास

वसई किल्ला मराठा सेनापती चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली १७३९ मध्ये झालेली ऐतिहासिक 'वसईची लढाई' यासाठी ओळखला जातो.

History | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : 'धाराशिव'मधील किल्ला, पावसाळ्यात दिसते धबधब्याचे अद्भुत सौंदर्य

Dharashiv Fort | saam tv
येथे क्लिक करा...