Shreya Maskar
नळदुर्ग किल्ला हा धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील किल्ला आहे. हा किल्ला सोलापूरपासून ५० किमी आणि तुळजापूरपासून ३५ किमी अंतरावर स्थित आहे.
नळदुर्ग किल्ल्यातून वाहणारी बोरी नदी आणि 'नर' व 'मादी' हे जुळे धबधबे ही या किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.नळदुर्ग किल्ला हा बोरी नदीवर बांधलेल्या मध्ययुगीन काळातील दगडी धरणासाठी प्रसिद्ध आहे.
नळदुर्ग किल्ला १० व्या ते १२ व्या शतकादरम्यान चालुक्य राजवटीने बांधला होता. हा किल्ला त्याच्या स्थापत्यशैलीसाठी, ११४ बळकट बुरुजांसाठी आणि धरणाच्या आत बांधलेल्या अद्वितीय 'पाणी महाला'साठी प्रसिद्ध आहे.
नळदुर्ग किल्ला हा अनियमित आणि लांबट आकाराचा भू-दुर्ग आहे. या किल्ल्याने बोरी नदीच्या पात्रात घुसलेल्या एका मोठ्या बेसाल्ट खडकाच्या भागाला आपल्या कवेत घेतले आहे. हा किल्ला १०५ एकर क्षेत्रावर पसरलेला असून त्याचा परिघ ३ किलोमीटरचा आहे.
नळदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना एक महत्त्वाचे आणि मोक्याचे युद्धक्षेत्र ठरला होता.
मुंबईहून नळदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी ट्रेनने सोलापूरपर्यंत प्रवास करा. सोलापूर स्टेशनपासून रिक्षाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जा.
नळदुर्ग किल्ल्याचे नाव राजा नलराजा यांच्या नावावरून पडले आहे. या नावात 'नळ' हा शब्द राजाचा निर्देश करतो, तर 'दुर्ग' हा किल्ला किंवा बुरुज/कोट दर्शवणारा संस्कृत शब्द आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
NEXT : जुन्नरला जात असाल तर 'हा' किल्ला पाहायला विसरू नका, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम अनुभवाल