ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोकणातील हापूस आंबा हा सर्वांनाच आवडतो. परंतु हापूस आंब्यासोबत इतर अनेक आंबे खायला चविष्ट असतात.
पायरी आंबा खायला अतिशय चविष्ट आणि गोड असतो. हा आंबा कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळमध्ये पिकतो.
केसर आंब्याला एक विशिष्ट सुगंध असतो. हा आंबा गुजरात आणि अहमदाबादमध्ये पिकतो.
आंब्यामधील सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक म्हणजे दशेरी आंबा. उत्तर प्रदेशमध्ये हा आंबा प्रामुख्याने पिकतो.
तोतापुरी आंबा आकाराने थोडासा वेगळा असतो. हा आंबा आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि तिमिळनाडून पिकतो.
लंगडा आंबा हा पश्चिम बंगाल, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पिकतो.
हापूस आंब्यासोबत हे इतर आंबे चवीला अतिशय गोड असतात.