Shreya Maskar
वरीचा डोसा बनवण्यासाठी वरीचे तांदूळ, साबुदाणा, उकडलेला बटाटा, लिंबाचा रस, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
वरीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम वरीचा तांदूळ आणि साबुदाणा एकत्र स्वच्छ धुवून भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी मिश्रणातील पाणी काढून टाका.
भिजलेले तांदूळ आणि साबुदाणे मिक्सरमध्ये वाटून घ्या.
यात शिजवलेला बटाटा, वरीच्या तांदळाचे पीठ घालून फेटून घ्या.
त्यानंतर चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
पॅनवर बटर लावून डोशाचे पीठ पसरवून घ्या.
शेंगदाण्याच्या चटणीसोबत वरीच्या डोशाचा आस्वाद घ्या.
NEXT : काकडीपासून बनवा गोल टम्म फुगलेला वडा, वाचा गावाकडची रेसिपी