Shreya Maskar
सणासुदीला खास जेवणासाठी काकडीचे वडे बनवा.
काकडीचे वडे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, गूळ, काकडी, वेलची पावडर, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
काकडीची साल काढून एका बाऊलमध्ये किसून घ्या.
यात किसलेला गूळ आणि गव्हाचे पीठ घालून कणीक मळून घ्या.
१०-१५ मिनिटे कणीक बाजूला ठेवून द्या.
आता कणकेचे छोटे गोळे करून त्याचे वडे थापून घ्या.
काकडीचे वडे तेलात खरपूस गोल्डन फ्राय करा.
हाताला वड्याचे पीठ चकटू नये म्हणून पाणी लावा.