Shruti Vilas Kadam
दूध, साखर, कॉर्नफ्लोअर, व्हॅनिला एसन्स आणि बटर किंवा क्रीम हे साहित्य आधी तयार ठेवा.
थोड्या थंड दुधात कॉर्नफ्लोअर नीट विरघळून घ्या, गाठी राहू देऊ नका.
कढईत उरलेले दूध मध्यम आचेवर गरम करा. दूध उकळू लागल्यावर त्यात साखर घाला.
दूध ढवळत असतानाच कॉर्नफ्लोअरचे मिश्रण हळूहळू घाला, जेणेकरून पुडिंगला गाठी पडणार नाहीत.
सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट आणि मऊ झाल्यावर गॅस बंद करा.
गॅस बंद केल्यानंतर व्हॅनिला एसन्स आणि थोडे बटर/क्रीम घालून नीट मिसळा.
पुडिंग वाटीत काढून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ड्रायफ्रूट्स किंवा फळांनी सजवून सर्व्ह करा.