Shreya Maskar
व्हॅनिला आइस्क्रीम बनवण्यासाठी फुल क्रीम दूध, कस्टर्ड पावडर, साखर, व्हॅनिला इसेन्स आणि ड्रायफ्रूट इत्यादी साहित्य लागते.
व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी मोठ्या भांड्यात फुल क्रीम दूध उकळायला ठेवा.
छोट्या बाऊलमध्ये गरम दूध काढून त्यात कस्टर्ड पावडर मिसळा.
कस्टर्ड पावडर ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोर देखील वापरू शकता.
उकळत्या दुधात साखर आणि कस्टर्डचे मिश्रण घालून सतत ढवळत राहा आणि थोड्या वेळाने गॅस बंद करा.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि मलई घालून छान एकत्र करा.
हे मिश्रण हवाबंद डब्यात भरून 4-5 तास फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा.
त्यानंतर आईस्क्रीम ब्लेंडरमध्ये ब्लेंड करा जेणेकरून तो मऊ आणि मलईदार होईल. त्यानंतर मिश्रणात ड्रायफ्रूट्स टाकून पुन्हा 4-5 तास आईस्क्रीम फ्रिजमध्ये ठेवा.