Siddhi Hande
वांग्याची भाजी ही अनेकांना आवडत नाही. लहान मुले वांग्याची भाजी खाताना नाक मुरडतात.
तुम्ही घरीच वांग्याचे कुरकुरीत काप बनवू शकतात. हे काप खूपच चविष्ट असतात.
काळ्या रंगाचे वांग, हळद, लाल तिखट, बेसन पीठ, जिर-धना पावडर,तेल, कोथिंबीर आणि मीठ
सर्वात आधी वांग स्वच्छ धुवून त्याचे गोलाकार काप करावेत.
यानंतर एका ताटात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने-जिरेपूड, मीठ मिक्स करावे.
हे वांग्याचे काप या मसाल्यात छान मिक्स करुन घ्या. दोन्ही बाजूने वांग्याच्या कापांना मसाला लागला पाहिजे.
यानंतर अजून एका ताटात बेसन, रवा आणि मीठ मिक्स करा.
मसाला लावलेले वांग बेसन पीठात छान घोळवून घ्या.
यानंतर तव्यावर तेल टाका. त्यावर हे वांग्याचे काप ठेवा.
यानंतर तुम्ही हे वाग्याचे काप छान शॅलो फ्राय करुन खाऊ शकतात.