ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुलाबाचा केक हा नेहमी स्पेशल दिवशी बनवला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या खास व्यक्तीसाठी हा केक घरी सहज बनवू शकता.
सर्वात आधी गुलाबाच्या पाकळ्या साखरेसोबत बारिक करुन गुलाबी सारख तयार करुन घ्या.
आता एका बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घ्या. या घटकांना चाळून घेवून मिश्रण बनवा.
त्यानंतर, अंडी, व्हॅनीला एसेन्स आणि गुलाबी साखर फेटून गुळगुळीत मिश्रण तयार करा.
ओल्या मिश्रणात सुके मिश्रण टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा. जेणेकरुन पिठ मऊ होईल.
तयार केलेल केकचे बॅटर केक टिनमध्ये टाका आणि १८० डिग्रीवर ठेवून २५ ते ३० मिनिटे बेक करुन घ्या.
केक बाहेर काढा त्याला थोडा वेळ थंड होऊन द्या आमि मग फ्रीजमध्ये ठेवा. तसेच केकवर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यासुध्दा टाकू शकता.
तुमचा गुलाब फ्लेवर केक तयार आहे. तुमच्या पार्टनरला सर्व्ह करुन खाण्याचा आनंद घ्या.