ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चोको लावा केक हे कप केक सारखे असतात. चोको लावा म्हणजे त्यांना कापल्यानंतर आतमधून मेल्टेड चॉकलेट बाहेर येते. हे केक टेस्टी आणि खूप सॉफ्ट असतात.
रिफाइंड मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, दूध, व्हॅनिला एसेन्स, बटर आणि चॉकलेट चिप्स इत्यादी साहित्य लागते.
सर्वातआधी मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या.
एका भांड्यात साखर, दूध, व्हॅनिला एसेन्स आणि वितळलेले बटर एकत्र करा आणि चांगले फेटून घ्या.
आता दोन्ही मिश्रण एकत्र करुन गुळगुळीत पीठ तयार करा. पीठ ग्रीस केलेल्या साच्यात ओता आणि मध्यभागी चॉकलेट चिप्स ठेवा.
प्रीहीटेड ओव्हनमध्ये २०० डिग्रीवर १० ते १२ मिनिटे बेक करुन घ्या. तसेच तुम्ही पॅनमध्ये देखील झाकून बेक करु शकता.
एकदा बेक झाल्यावर, त्यांना मध्येच कापून घ्या किंवा गरमागरम सर्व्ह करा आणि आस्वाद घ्या.