Siddhi Hande
व्हॅलेंटाइन डे १४ फेब्रुवारीचा साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रेम व्यक्त केले जाते असं म्हणतात.
व्हॅलेंटाइन डेनिमित्त तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी काहीतरी स्पेशल करा. जेणेकरुन त्याला किंवा तिला खूप आनंद होईल.
तुम्ही घरीच स्ट्रॉबेरी चीजकेक बनवू शकतात. ही रेसिपी तुम्ही स्वतः बनवली तर तुमच्या पार्टनरला खूपच आनंद होईल.
१५-२० डायजेस्टिव्ह बिस्कीट्स, लोणी, चीज, पीठीसाखर, विपिंग क्रिम, इसेन्स, स्ट्रॉबेरी प्युरी, स्ट्रॉबेरीचे तुकडे
सर्वात आधी तुम्हाला बिस्कीचे कुस्करुन घ्यायची आहे. त्यात लोणी मिक्स करा. लोणी नसेल तर मिल्क क्रिम टाकू शकतात.
यानंतर हे मिश्रण टीन डब्याच्या तळाशी ठेवा. हे मिश्रण १५-२० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
यानंतर क्रीन चीज आणि पिठीसाखर एकत्र मऊ होईपर्यंत फेटून घ्या. त्यात व्हॅनिला इसेन्स आणि स्ट्रॉबेरी प्युरी टाका.
एका दुसऱ्या भांड्यात विपिंग क्रीम घट्ट होईपर्यंत फेटून घ्या. नंतर क्रिम चीज या मिश्रणात टाका.
यानंतर बिस्कीटाच्या बेसवर हे क्रिम टाका. हे क्रिम व्यवस्थित सेट करुन घ्या.
हा केक ६-७ तास फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. यानंतर केक बाहेर काढल्यावर त्यावर स्ट्रॉबेरीचे काप टाकून सजवा.