Siddhi Hande
व्हॅलेंटाईन वीक म्हणजे प्रेमाचा आठवडा सुरु झाला आहे. प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा असतो.
तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी खास स्ट्रॉबेरी केक बनवू शकतात. या केकची रेसिपी खूप सोपी आहे.
मैदा, पीठीसाखर, दही, तेल, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, स्ट्रॉबेरी क्रश, इसेन्स, फूड कलर
सर्वात आधी तुम्हाला ओव्हन प्रीहीट करायचा आहे. जर ओव्हन नसेल तर कढईत मीठ टाकून १० मिनिटे गरम करा.
यानंतर केकच्या टिनला तेल लावा. त्यावर बटर पेपर लावा.
यानंतर एका भांड्यात दही, साखर, तेल आणि स्ट्रॉबेरी क्रश किंवा इसेन्स मिक्स करायचा आहे.
यानंतर या मिश्रणात मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा चाळून टाकायचा आहे. यात आवश्यकतेनुसार दूध टाका.
या मिश्रणाच्या गुठल्या होऊ देऊ नका.
यानंतर बॅटर केकच्या टिनरमध्ये टाका. ३०-४० मिनिटे बेक करा.
यानंतर केक थंड झाल्यावर त्यावर व्हीप क्रिम किंवा स्ट्रॉबेरीचे तुकडे लावून सजवून घ्या.