Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला चटपटीत दाबेली खायला सर्वांनाच आवडते. अनेकजण दाबेली खातात.
दाबेली बनवण्याची रेसिपी सोपी आहे. दाबेली बनवण्यासाठी दाबेलीचा मसाला महत्वाचा आहे.
दाबेली मसाला बनवण्यासाठी धने, जिरे, बडीशेप, लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, सुके खोबरे, तीळ, लाल मसाला, काळे मीठ, पिठी साखर, तेल हे साहित्य एकत्र करा.साले
एका कढईत धने, जिरे, बडीशेप, लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र आणि चक्रीफूल चांगले भाजून घ्या.
या मिश्रणात सुके खोबरे आणि तीळ मिक्स करा नंतर सर्व मसाले थंड करून मिक्समध्ये बारीक करा.
कुकरमध्ये बटाटे उकडून त्याचे साल काढून चांगले कुस्करून घ्या वाटीत चिंच पाणी मिक्स करून चिंचाचं पाणी तयार करा.
गॅसवर पॅनवर बटरमध्ये बटाट्याचे मिश्रण घाला नंतर त्यात हळद, मसाला, साखर तयार दाबेली मसाला, चिंचेचं पाणी मिक्स करा.
अशाप्रकारे घरच्या घरी दाबेली मसाला तयार होईल.