Manasvi Choudhary
प्रेमाचा आठवडा म्हणजे व्हॅलेनटाईन वीक दरवर्षी ७ फेब्रुवारीपासून सुरू होता. उद्या पहिला दिवस 'रोझ डे' आहे.
व्हॅलेनटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोझ डे. रोझ डे साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र आम्ही काही हटके सेलिब्रेशन तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या नात्यात प्रेमच प्रेम बहरेल.
रोझ डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला केवळ एक गुलाबाचे फूल न देता कस्टमाईज गुलाबाचे बुके आणि आवडणाऱ्या गोष्टी म्हणजेच चॉकलेट्स, ज्वेलरी देऊ शकता.
प्रेमाचे प्रतीक असलेल्या लाल गुलाबासोबत तुम्ही मैत्री आणि आदरयुक्त गुलाबी आणि पिवळे गुलाब देखील पार्टनरला देऊ शकता.
जर तुम्ही एकमेकांना भेटणार असाल तर तेथे गुलाबाचे डेकोरेशन करा यामुळे रोमॅटिक वातावरण तयार होईल.
गुलाबाच्या पाकळ्यांनी टेबल सजवून डिनर करा. असं केल्याने तुमचा पार्टनर देखील खूप खूश होईल. गुलाबाचे फ्लेवर्स असलेले मेन्यू ऑर्डर करा.
जर तुम्ही तुमच्या पार्टनरपासून लांब आहात तर डिजीटल कोलाज व्हिडीओ बनवा ज्यात तुमच्या दोघांचे फोटो अॅड करा गुलाबाची डिझाईन ठेवा.
रोझ डे निमित्ताने दोघे मिळून बागेत किंवा कुंडीत गुलाबाचे रोप लावा. जसे ते रोप वाढेल, तसे तुमचे नाते बहरेल.