Shreya Maskar
'व्हॅलेंटाईन वीक'ला सुरूवात झाली असून एका मागोमाग एक डे सेलिब्रेट केले जात आहे. उद्या (11 फ्रेबुवारी 2026) ला प्रॉमिस डे आहे. त्यांचे सुंदर सेलीब्रेशन करा.
प्रॉमिस डे तुमच्या नात्याची वीण आणखी घट्ट करेल. तसेच नाते बहरण्यासाठी तुम्ही दोघे एकमेकांना प्रेमाचे वचन द्या आणि कायम एकमेकांची सोबत करा.
आजच्या डिजिटल जगात हाताने लिहिलेले पत्रे, प्रेमाच्या नोट्स एक अनोखी भावना व्यक्त करते. 'तुम्ही त्यांच्यासोबत कायम आहात' ही भावना व्यक्त करणारे पत्र लिहा.
आपल्याला अनेकदा काही गोष्टी पटकन बोलता येत नाही. अशा वेळी शब्दाच्या रुपात त्या तुम्ही कागदावर मांडा. जोडीदार खूप खुश होईल.
रोजच्या धावपळीच्या जगात निवांत 2 मिनिटे बोलणे ही कठीण होते. अशावेळी मस्त कॅन्डललाइट डिनर प्लान करा. घरी किंवा रेस्टॉरंटमध्ये रोमँटिक डिनर डेटचा प्लान करा आणि आपल्या भावना व्यक्त करा.
भेटवस्तू प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. त्यामुळे प्रॉमिस डे ला अशी एखादी वस्तू द्या की ती कायम तुमच्या जोडीदाराच्या जवळ राहील. उदा. कस्टमाइज्ड ब्रेसलेट, फोटो फ्रेम , अंगठी
प्रॉमिस डेचा खरा उद्देश केवळ वचने देणे नाही तर ती पाळणे देखील आहे. तुमच्या जोडीदाराला असे वचन द्या, जे तुमचे नाते अधिक मजबूत करेल. तुमच्या नात्यात प्रेम वाढेल आणि विश्वास कायम राहील.
छोट्या गोष्टी देखील तुमच्या नात्यात आनंद आणू शकतात. त्यामुळे एखादी अशी गोष्ट करा, जी पाहून तुमचा जोडीदार तुमच्या नव्याने प्रेमात पडेल. तसेच त्याला समजले की, तुमच्यासाठी ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे.