Shreya Maskar
उद्यापासून 'व्हॅलेंटाईन वीक'ला सुरूवात होत आहे.
याची सुरूवात गोड करण्यासाठी जोडीदारासाठी खास स्वतःच्या हाताने बासुंदी बनवा.
बासुंदी बनवण्यासाठी दूध, वेलची, केशर, बदाम , लिंबाचा रस, साखर इत्यादी साहित्य लागते.
बासुंदी बनवण्यासाठी सर्वप्रथम गरम पॅनमध्ये दूध उकळून घ्या.
दूध थोडे घट्ट झाले की, पॅनमध्ये थोडा लिंबाचा रस घालून दूध 10 मिनिटे मंद आचेवर उकळा.
आता या मिश्रणात साखर घालून चांगले मिक्स करून घ्या.
एका बाऊलमध्ये दूध, केशर आणि थोडी वेलची पावडर मिक्स करून बासुंदीच्या पॅनमध्ये टाका.
अशाप्रकारे अवघ्या १५ मिनिटांत गोड बासुंदी तुमच्या जोडीदारासाठी बनवा.