Wheat Flour Ladoo: कमी वेळात बनवा स्वादिष्ट मिठाई, गव्हाच्या पीठाचे पौष्टिक लाडू करण्याची सोपी रेसिपी

Dhanshri Shintre

गोड खाण्याची इच्छा

घरात पाहुणे आले किंवा गोड खायची इच्छा झाली, तर कणकेचे लाडू झटपट तयार करता येतात. हे लाडू चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवता येणारे आहेत.

Wheat flour Ladoo | google

गव्हाचे लाडू

गव्हाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात. फक्त तीन मुख्य घटक वापरून स्वादिष्ट लाडू तयार करा. रेसिपी जाणून घ्या आणि पटकन तयार करा.

Wheat flour Ladoo | google

साहित्य

२ वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तूप आणि २ वाट्या गूळ वापरून स्वादिष्ट गव्हाचे लाडू बनवा. कमी वेळेत सोपी रेसिपी तयार करा.

Wheat flour Ladoo | google

कृती

कढईत तूप गरम करा. तूप गरम झाल्यानंतर त्यात गव्हाचे पीठ टाका आणि चांगले भाजून सुवासिक होईपर्यंत हलवत राहा.

Wheat flour Ladoo | google

पीठ सतत ढवळा

गव्हाचे पीठ चमच्याने सतत हलवा आणि मंद आचेवर सुमारे १५ मिनिटे भाजा, जोपर्यंत पीठ सुवासिक आणि सोनेरी रंगाचे होत नाही.

Wheat flour Ladoo | google

गुळाची पूड घाला

गॅस बंद केल्यानंतर, पीठ थोडेसे थंड होऊ द्या आणि त्यामध्ये गुळाची पूड व्यवस्थित मिसळा.

Wheat flour Ladoo | google

पीठ चांगले मिक्स करा

गूळ पावडरसह पीठ चांगले एकत्र करा आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचे लाडू तयार करा.

Wheat flour Ladoo | Freepic

ड्रायफ्रूट्स घालून सजवा

इच्छेनुसार ड्रायफ्रूट्स घालून लाडू सजवा. गोडसर आणि पौष्टिक गव्हाचे लाडू आता खाण्यासाठी तयार आहेत.

Wheat flour Ladoo | Yandex

NEXT: खवय्यांसाठी खास! घरच्याघरी बनवा स्वादिष्ट शाही मोघलाई पराठा, सोपी आणि झटपट रेसिपी

येथे क्लिक करा