Dhanshri Shintre
औरंगाबादमध्ये अलीकडेच रंगतदार फूड फेस्टिवल संपन्न झाला, जिथे विविध स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी अनुभवायला मिळाली. शहरातील खवय्यांनी मोठ्या उत्साहात या फेस्टिवलला भेट दिली.
औरंगाबाद फूड फेस्टिवलमध्ये शाही मोघलाई पराठ्याने खवय्यांची मने जिंकली. या खास पराठ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, त्याच्या अनोख्या चवीची चर्चा सर्वत्र रंगली.
शाही मोघलाई पराठ्याची चव घरीच अनुभवायची आहे का? सोपी रेसिपी जाणून घ्या आणि घरच्या घरी हा खास पराठा तयार करून कुटुंबासह स्वादाचा आनंद घ्या.
शाही मोघलाई पराठा घरी बनवण्यासाठी गाजर, शिमला मिरची, फुलकोबी, पनीर, मसाले आणि मैद्यासह बेकिंग पावडर लागते.
सुरुवातीला गाजर, हिरवी मिरची आणि फुलकोबी किसून घ्या व त्यांना तव्यावर हलकं परतून घ्या. यामुळे भरणीला छान चव आणि सुगंध येईल.
त्यानंतर मैद्याचे पीठ मळून घ्या आणि त्याची गोलसर पोळी लाटून तयार करा. ही पोळी पराठ्याच्या बाह्य थरासाठी मऊ आणि लवचिक असणे आवश्यक आहे.
लाटलेल्या पोळीवर भाजलेला मसाला समान पसरवा आणि नंतर तिच्या चारही बाजूंनी नीट दुमडून बंद करा, जेणेकरून पराठ्याचा स्वादिष्ट भराव आतमधून सुरक्षित राहील.
तव्यावर थोडं तेल गरम करून तयार पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
सुवासिक आणि चविष्ट शाही मोघलाई पराठा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.