Shreya Maskar
कागदाचे गुलाब बनवण्यासाठी क्राफ्ट पेपर, लाल, हिरवा, चॉकलेटी रंगाचा घोटीव कागद, कात्री, काठी, गोंदची पेस्ट आणि इतर डेकोरेशनचे साहित्य लागते.
लाल रंगाच्या घोटीव कागदावर एक वर्तुळ काढा.
कात्रीच्या साहाय्याने गोल स्पायरल आकार कापून रोल करा.
मध्यभागी गोंदची पेस्ट लावून स्पायरल स्टिक करून घ्या.
आता हिरवा रंगाच्या घोटीव कागदावर पानाचे आकार काढून छान कापून घ्या.
गुलाबाला देठ लावण्यासाठी एक काठी घेऊन त्याला चॉकलेटी रंगाचा घोटीव कागद गुंडाळा.
अशाप्रकारे तुम्ही विविध रंगाची ४ ते ५ फुले करून घ्या.
या रंगीबेरंगी फुलांचा रिबनच्या साहाय्याने फुल गुच्छ बनवा.