Manasvi Choudhary
मिठी मारणे ही प्रेम व्यक्त करण्याची एक भावना आहे.
जे बोलण्यातून व्यक्त होत नाही ते क्रियेतून व्यक्त केले जाते.
एकमेकांना मिठी मारल्याने रक्तप्रवाह सुधारतो
अती रक्तदाब अथवा कामाचा ताण असलेल्या व्यक्तीने प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने ताण कमी होतो.
जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीला मिठी मारल्यामुळे मनात आनंदाचे वातावरण निर्माण होते. काळजी, चिंता दूर होते.
मिठीमध्ये एखाद्याचा राग निवळण्याची ताकद असते. कारण मिठीमुळे तुम्ही तुमच्याजवळील चांगला भावना समोरच्याव्यक्तीमध्ये परवर्तित होतात.
कधीकधी मनात एकटेपणा, भिती जाणवते, आपल्या कुटुंबियाना किंवा प्रिय व्यक्तीला मारलेली घट्ट मिठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मदत करते.
प्रसन्न मनाचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. मन आणि शरीर उत्तम असेल तर तुम्ही आजारपणांपासून नक्कीच दूर असता.