Shreya Maskar
विदर्भात हिवाळ्यात वालाच्या शेंगाची भाजी प्रामुख्याने बनवली जाते. वालाच्या शेंगाची भाजीला पावटा भाजी देखील म्हणतात. यात अधिक पोषक घटक असतात.
वालाच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी वालाच्या शेंगा, खोबरे-लसूण-आलं पेस्ट, टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला , हळद, धणे पावडर, मिरची पावडर, मीठ, शेंगदाण्याचा कूट इत्यादी साहित्य लागते.
वालाच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम वालाच्या शेंगा सोलून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.
आता पॅनमध्ये तेल गरम करा. तेलात जिरे, मोहरी टाकून फोडणी करा. यात खोबरे-लसूण-आलं पेस्टयांची पेस्ट टाका आणि खरपूस भाजून घ्या.
फोडणी गोल्डन फ्राय झाला की, यात गरम मसाला, हळद, धणे पावडर, काळा मसाला आणि लाल तिखट टाका. तुम्हाला पाहिजे तेवढे तिखट बनवा.
मसाल्याला चांगले तेल सुटले की कोथिंबीर , बारीक चिरलेला टोमॅटो टाकून ४-५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या. त्यानंतर यात वालाच्या शेंगा टाकून परतून घ्या.
2-3 मिनिटांनी भाजी मिक्स करून त्यात शेंगदाण्याचा कुट टाका. शेंगदाण्याचा कुटमुळे भाजीची चव आणखी वाढेल आणि मुलं आवडीने खातील.
आता गरमागरम चपाती, भाकरी सोबत चवदार वालाच्या शेंगाची भाजी आस्वाद घ्या. तुम्ही ही रेसिपी सकाळी डब्याला देखील बनवू शकता.